Online Team
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात.या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत.ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी,भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहेत.त्यामुळे दिवाळी पूर्वीच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी महिलांना 3 हप्ते (4500)जमा झालेले आहेत.त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा गोड होणार आहे.