कबनूर मध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट,एकाचा मृत्यू

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर येथील म.फुले नगर मधील अमन फटाका मार्ट या फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन परवेझ मुजावर (वय 35)यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले असून पंचनामा करणे सुरू आहे.

घटनास्थळी पाहणी करताना कबनूर तलाठी व मंडल अधिकारी

याबाबत अधिक माहिती अशी की ,येथील कबनूर कोल्हापूर रोडवर,महात्मा फुले नगर नजीक मुजावर यांचा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे.सकाळी नेहमीप्रमाणे कारखाना उघडून आत जाताच मोठा स्फोट झाला.स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की,गोडाऊनच्या भिंती जमीनदोस्त झाल्या होत्या तर पत्रे दूरवर उडून गेले होते.सुमारे दोन किलोमीटर पर्यंत आवाज गेला होता.परवेझ हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता.त्याचा मित्र परिवार मोठा होता.त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *