अरुण विकास सोसायटीच्या सभापतीपदी किरण पाटील तर उपसभापती पदी संजय पाटील

चंदूर/प्रतिनिधी
चंदूरच्या अमृतमहोत्सवी, सहकार भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कै. दे .क. पाटील अरुण विकास सेवा सोसायटीच्या सभापतीपदी किरण पाटील व उपसभापती पदी संजय पाटील त्यांची एकमताने निवड झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निबंधक, कार्यालय चे उदय उलपे हे होते.

जिल्ह्यात आदर्श असणाऱ्या या सोसायटीची वाटचाल दैदिप्यमान अशी आहे.नूतन सभापती पदासाठी किरण पाटील यांंचे नाव प्रभाकर पाटील यांनी सुचविले. तर अण्णासो पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले .उपसभापती या पदासाठी संजय पाटील यांचे नाव प्रकाश पाटील यांनी सुचवले व त्यास शिवगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी एक, एक अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असे सभाध्यक्ष उदय उलपे यांनी घोषित केले.

यावेळीसभापतींचा व उपसभापतींचा सत्कार उदय उलपे यांच्या हस्ते करण्यात आला.सभेस रघुनाथ पाटील, प्रभाकर पाटील, अण्णासो पाटील , दत्ता पाटील, पायगोंडा झोले, मारुती जाधव,उत्तम मिठारी ,प्रकाश पाटील ,शैलजा पाटील, वैशाली खटावकर, बजरंग घोडके, काशिनाथ पुजारी ,चंद्रकांत कांबळे आदी संचालक सचिव जयवंत राणे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.आभार रायगोंडा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *