कबनूर-प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत,कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने वर्षा कोरे व भक्ती शिंदे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात सरपंच सौ. शोभा पोवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते बी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम बी. डी. पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले.सरपंच सौ. शोभा पोवार यांनी स्वागत केले.यानंतर कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या अंगणवाडी सेविका सफुरा शेखजी, सुश्मिता नोरजे, सुवर्णा शेटे व सुजाता कदम यांचा ग्राम- पंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यानंतर उपसरपंच सुनिल काडाप्पा,वर्षा कोरे,यानी मनोगत केले.

यावेळी मुख्याध्यापिका स्नेहलता शेटे, ग्रा. पं. सदस्य प्रविण जाधव,सुधीर पाटील,सदस्या सौ.अर्चना पाटील,ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग,खंडेराव परीट, अजित शिंदे,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.उपसरपंच सुनिल काडाप्पा यानी आभार मानले.