संविधानाचे तत्त्वज्ञान अधिक ताकतीने पुढे नेण्याची गरज-अशोक केसरकर

इचलकरंजी-प्रतिनिधी
आम्ही भारतीय लोक ‘अशी सुरुवात करून ‘ स्वतः प्रत अर्पण करीत आहोत ‘ असा समारोप करणारा भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच भारतीय विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका या साऱ्याचा मुख्य गाभाघटक आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संघराज्यीय एकात्मता आदी सर्व मूल्ये महत्वाची आहेत. समाजातील शेवटच्या माणसाला विकासाची संधी मिळावी हा संविधान कर्त्यांचा हेतू आहे.

संविधानाने नमूद केलेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याचे कर्तव्य भावनेने सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीचा,सामाजिक न्यायाचा , दर्जाच्या व संधीच्या समतेचा आग्रह अत्यंत महत्वाचा आहे. संविधान मंजुरीच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना आपण हा आशय अधिक ताकदीने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे,असे मत ज्येष्ठ अभ्यासक अशोक केसरकर यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘संविधानाचे तत्वज्ञान ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.रमेश लवटे होते.

प्रारंभी रामभाऊ ठिकणे यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्रा.रमेश लवटे म्हणाले, भारतीय राज्यघटना हा माणसाला योग्य प्रकारची संधी देणारा एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. सर्वांगीण समता आणि समानतेच्या अंमलबजावणीसाठी संविधान साक्षरतेची नितांत गरज आहे.

यावेळी अन्वर पटेल, राजन मुठाणे, डी.एस. डोणे, पांडूरंग पिसे, दयानंद लिपारे,सचिन पाटोळे,शकील मुल्ला,शहाजी धस्ते, गजानन पाटील,रशीद मुल्लाणी नौशाद शेडबाळे यांनी आभार मानले.

कबनूर ग्रा.पं. मध्ये संविधान दिन साजरा

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. शोभा पोवार यांच्या हस्ते करणेत आले. संविधान प्रस्ताविकेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या सौ. सुलोचना कट्टी यांचे हस्ते करणेत आले. संविधान प्रस्ताविकेचे वाचन ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक सुभाष पोवळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मधूकर मणेरे,सैफ मुजावर, श्रीमती रजनी गुरव,संजय कट्टी, महेश पाटील, सूरज शिंगे, लक्ष्मण चव्हाण, विष्णू सुतार, मारुती वडर, जुबेर सनदी, सुभाष कांबळे, आण्णा चव्हाण, आदी उपस्थित होते.

बौद्ध समाज धम्म संस्कार केंद्र

बौद्ध समाज धम्म संस्कार केंद्र कबनूर ,डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन कबनूर याठिकाणी “संविधान दिन”मोठ्या प्रमाणात संपन्न करण्यात आला.दिप प्रज्वलन राजेंद्र फरांडे यांनी केले.

केंद्राचे अध्यक्ष अजित शिंदे आणि उपाध्यक्ष नेताजी कांबळे यांनी संविधान प्रती चे पूजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी मदन कांबळे यांनी उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. या वेळी सचिव बी.जी. देशमुख यांनी संविधान विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रकाश शिंगे, विलास शिंदे आदी उपस्थित होते.मधुकर फरांडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *