कबनूर – प्रतिनिधी
येथील श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर व नामदेव मंदिर गावभाग, ग्रामस्थ यांचेवतीने कबनूर ते पंढरपूर कार्तिक पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली.

ह.भ.प. सुधाकर महाडीक यानी स्वागत केले. यानंतर सकाळी १० वा. वीणा पूजन, तुळस व मृदंग पूजन ललीत कुमार जोशी व आनंद पारीख यांचे हस्ते झाले. यानंतर दिंडी सोबत जाणाऱ्या टेंपो गाडीचे पूजन माजी ता. पं. सदस्य जयकुमार काडाप्पा, डॉ.अस्मिता मिश्रा, आण्णासो पाटील ढंग, सुभाष कोले आदींच्या हस्ते झाले. यानंतर श्रीफळ वाढवून दिंडी प्रस्थान करण्यात आले. दिंडीचे हे १२ वे वर्ष आहे.

दिंडी दरम्यान माजी उपसरपंच निलेश पाटील यांच्या घरी समस्त वारक-याना चहा नाष्टा देण्यात आला. येथे रिंगण सोहळा झाला. निलेश पाटील व त्यांच्या पत्नी सौ. वर्षा पाटील यानी दिंडीची पूजा केली. यावेळी माजी जि. प. सदस्य डॉ राहुल आवाडे व उपसरपंच सुधीर लिगाडे यानी दिंडीस भेट देवून आशिर्वाद घेतले.यानंतर दिंडी मार्गस्थ झाली.दिंडीचे आयोजन ह. भ. प. सुधाकर महाडीक यानी केले. दिंडीमध्ये १५० ते १७५ वारक-यांचा समावेश असून दिंडीचे पूर्ण नेतृत्व दिंडी मालक सुधाकर महाडीक यांनी केले.