हृदय फौंडेशन व विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्य प्रेरणादायी -एपीआय ऊर्मिला खोत

चंदूर/प्रतिनिधी
चंदुर तालुका हातकणंगले येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हृदय फौंडेशन व विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालयामार्फत रक्तदानशिबिर संपन्न झाले.हृदय फौंडेशन व विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असून दोन्हीही संघटना नवतरूणांना प्रेरणा देणारी ऊर्जा केंद्र आहेत असे प्रतिपादन इचलकरंजी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथक प्रमुख उर्मिला खोत यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिन व हृदय फौंडेशन,महाराष्ट्र यांच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन जेष्ठ नागरिक शिवकालीन मर्दानी खेळाचे वस्ताद बापूसो मांगलेकर व राष्ट्र सेवादलाचे निष्ठावंत सैनिक बापूसो खटावकर यांच्या हस्ते करणेत आले.सदर शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी पवित्र अशा रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जपले.शिबिरामध्ये निर्भया पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक उर्मिला खोत यांच्या हस्ते फौंडेशनमार्फत रक्तदात्यांना सन्मानपत्र देणेत आले.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील,उपाध्यक्ष प्रमोद पाटील,सचिव प्रवीण पाटील,वडगाव बाजार समितीचे उपसभापती जगोंडा पाटील,रविंद्र झेले,सुरेश पाटील,राजेंद्र पाटील,राजेंद्र मिठारी, संजय पाटील,सुरेश कुंभार,रघुनाथ शिरढोणे,महादेव मिठारी,सर्व संचालक व ग्रंथपाल संदीप कुंभार लिपिक सचिन पाटील उपस्थित होते.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी संदीप यादव,सोमनाथ भोसले,विनायक सुतार,प्रतिक कांबळ, संचित पाटील, संतोष पाटील,अभिजीत पाटील, रामचंद्र मिठारी,रोहीदास माने,सचिन हुंदळेकर, शाहूनाथ मांगलेकर,महेश भोसले,अवधूत परीट,विवेक कांबळे,यासिन मोकाशी,धनाजी कुंभार,राहूल वाघमोडे, ओमकार पाटील, निलेश परीट,अमित कांबळे, मनोज पाटील,आदींनी यशस्वी संयोजन केले.शिबिरासाठी आधार ब्लड बँक इचलकरंजी येथील स्नेहल जाधव व टीम यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *