मुंबई/शैलेंद्र चव्हाण
पत्रकारांची लेखणी ही दुधारी तलवारी सारखी असते सत्ताधाऱ्यांना ती चांगली वाटते. तर विरोधकांना वाईट वाटते यामुळे समतोल राखून पत्रकारांनी पत्रकारीता करावी असे सांगत पत्रकार कल्याण महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करुन तो माग लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिले.
राज्यशासन व व्हाईस ऑफ मीडिया व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने मुंबईत यशतवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 23 फेब्रुवारी 2025 इ. रोजी महाराष्ट्र भूषण व पॉझीटीव्ह जर्नालिझम अवॉर्ड या पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी सौ. फडणवीस बोलत होत्या. व्यासपीठावर मंत्री मंगलप्रसाद लोढा. आमदार हेमंत पाटील, सुपरस्टार जॅकी श्रॉफ, मा. आमदार पाशा पटेल, स्वामी कंठानंद महाराज,डॉ. शुभ विलास, जनसंपर्क सचीव ब्रिजेशसिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. व्यंकटेश जोशी, सामाजिक कार्यकर्त्या सिमा सिंग, उद्योजक वैभव वानखेडे, आरोग्य तज्ञ डॉ. विजय दहीफळे, शेतीनिष्ठ शिवाजी बनकर, पत्रकार दिलीप वैद्य (जळगांव) , सुरज कदम (परभणी), संदीप खडेकर (यवतमाळ) इचलकरंजीचे पत्रकार बाळासो पाटील, मुंबई पत्रकार वृषाली पाटील, यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देणेत आले. कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी टी.व्ही. 9 चे पत्रकार साईनाथ जाधव यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष सचीन मोहीते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, यांचेसह महाराष्ट्रातील संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कारांची अपेक्षा न करता काम करत रहा ईश्वर तुमच्या पाठीशी राहील असे सांगितले तर. स्वामी कंठानंद स्वामी यांनी पत्रकारांनी अंहकार न बाळगता खरे भारतीयत्व कसे निर्माण होतील. हे पहावे. पत्रकारीता तळागाळात पोहचावी ती टीकात्मक नसावी.तसेच पत्रकारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन केले.
तर मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी हा कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो. राज्यात पत्रकारांच्यासाठी झटणारा संदीप काळे सारखा माणूस पाहीला नाही असे सांगून या संघटेनला माझा सदैव पाठींबा राहील असे सांगितले. आमदार हेमंत पाटील यांनी संदीप काळे यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. कोणतीही अपेक्षा न करता हा उत्कृष्ठ काम करणे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन व उत्कृष्ट नियोजन व्हाईस ऑफ मीडियाचे संदीप काळे यांनी केले.
यावेळी माजी आमदार पाशा पटेल, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनील म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडीया, मंगेश खाटीक, संदीप भाजीभाकरे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.