एन.एस.सोटी लॉ कॉलेज मध्ये यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

सांगली-(ऑनलाईन24 तास टीम)
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,सहकार औद्योगिक,शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन प्राध्यापिका ॲडव्होकेट मेघना लिमये यांनी केले.त्या एन.एस.सोटी लॉ कॉलेज यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट
मेहजबीन मुलाणी
यांनी केले.यावेळी प्रकाश शेंडगे,अजित लटके यांनी मनोगतातून यशवंतरावजी चव्हाण यांच्या कार्यास उजाळा दिला.यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *