चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस कोल्हापूर एलसीबीने ठोकल्या बेड्या,तब्बल 2 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर-प्रतिनिधी
चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगार अभिजीत अरूण सातपूते (रा. मिरज, जि. सांगली) याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून,त्याचेकडून जबरी चोरीचे 02 गून्हे उघडकीस आले आहेत.यामध्ये एकूण 2,81,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुध्दचे गुन्ह्यांसह जबरी चोरीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झालेने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविरुध्दचे गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन घडणारे गुह्यांना प्रतिबंध करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील वेगवेगळी पथके तयार करुन काल दिनांक- 03/06/2023 रोजी वटपोर्णिमा असल्याने सर्व महिला वटपोर्णिमा निमीत्त सोन्याचे दागिने घालून कार्यक्रमाकरीता घराबाहेर पडतात याचाच गुन्हेगार गैरफायदा घेवून चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडतात. त्याअनुषंगाने पेट्रोलींग करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

वटपोर्णिमाचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमंलदार महेश खोत यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारा पोलीस रेकॉर्डवरील अभिजीत अरूण सातपूते, रा. मिरज, जि. सांगली याने सुमारे १५ दिवसापुर्वी इचलकरंजी परिसरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असून तो परत चोंडेश्वरी फाटा जयसिंगपूर येथे त्याचे मोपेड गाडीवरून येणार असलेबाबत माहिती मिळाली.मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, तसेच पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे, महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण व रणजित पाटील यांचे तपास पथकाने काल दि. 03/06/2023 रोजी चौंडेश्वरी फाटा जयसिंगपूर येथे सापळा लावून हॉटेल जगात भारी कोल्हापूरी या हॉटेल समोर आरोपी नामे अभिजीत अरूण सातपूते, वय-३३, रा. मंगळवार पेठ, चर्च रोड, मिरज, ता. मिरज, जि. सांगली यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात सोन्याचे एक मिनी मंगळसूत्र व एक चेन असे एकूण अंदाजे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्हे करण्याकरीता वापरलेली टी. व्ही. एस. ज्युपिटर मोपेड गाडी एक व एक मोबाईल हँन्डसेट असा एकूण 2,81,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित आरोपीकडे अधिक तपास केला असता इचलकरंजी पोलीस ठाणे हददीतील 2 चेन स्नॅचिंग गुन्हयांची कबुली दिल्याने त्याचेकडून वरील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे. नमुद आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील असून त्याचेवर यापुर्वी सांगली व कोल्हापूर जिल्हयात जबरी चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ,तसेच पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे, महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, रणजित पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *