कबनूर मध्ये सुपरस्टार सर्कस चा भव्य शुभारंभ संपन्न

कबनूर/प्रतिनिधी
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा साखर कारखान्याच्या मुख्य गेट समोर, सुपरस्टार सर्कस दाखल झाली असून या सर्कशीचा भव्य शुभारंभ,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर व पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पि. एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सर्कशीचे मालक श्री प्रकाश माने,विजय माने यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माने बोलताना म्हणाले
आज इचलकरंजी व परिसरातील महिला वर्गाला व बालचमुना तसेच युवक वर्गाला या सर्कशीचा आनंद घेता यावा यासाठी,ही सर्कस दाखल झाली आहे.या सर्कशी मध्ये वेगवेगळे चित्त थरारक खेळ असून,हवाई झोका,चिपांजी सारखा दिसणारा माणूस, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मोटू पतलू ,मिकी माऊस, तसेच पोट धरून हसायला लावणारे जोकर यांच्यासह 100 कलाकार आपली कला सादर करत आहेत.याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे प्रतिपादन सर्कशीचे मालक श्री प्रकाश माने यांनी केले.

या शुभारंभ वेळी अनिल डाळ्या,मिश्रीलाल जाजु, प्रमोद पाटील,प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे, मा.सभापती रेश्मा सनदी,कोरोची सरपंच डॉ संतोष भोरे,मा.नगरसेवक मनोज हिंगमिरे,पापालाल सनदी,उपसरपंच आनंदा लोहार,कबनूर उपसरपंच सुनिल काडाप्पा,कोतवाल शिवाजी चव्हाण,विनोद कोराने,सचिन पोवार,महेश शिवूडकर,सनी सनदी,प्रकाश केणी,सुरेश कुंभार,युवराज पाटील,शिवाजी चव्हाण,यांसह प्रेक्षक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *