इंदिरा गृहनिर्माण संस्थेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारे सुरू-चेअरमन दिलीपराव झोळ

कबनूर-प्रतिनिधी
येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था ही आयएसओ मानांकीत व सभासदाना दरवर्षी भेटवस्तू देणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेचे संपुर्ण कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे सुरु करण्यात आले असून याबाबतची वेबसाईट सभासदाना देण्यात येईल असे प्रतिपादन चेअरमन दिलीप झोळ यानी केले. ते संस्थेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरुन बोलत होते. सभेपुढील सर्व विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आले.

संचालक विशाल दास यानी स्वागत केले. यानंतर संचालक बाळासो ऐनापुरे यानी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. सचिव शिवय्या जंगम यानी विषय पत्रिका व अहवाल वाचन केले. चेअरमन दिलीप झोळ यानी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, संस्थेच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॕमेरे बसविण्या बरोबरच कार्यालयाचे नुतनीकरण,
वृक्षारोपण करण्यात आले आहे.यानंतर जेष्ठ नेते सुधाकर मणेरे व संचालक पांडुरंग राजमाने यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल कुलकर्णी, महंमदयुनुस खतीब, सुरेंद्र मगदूम, दत्तात्रय भिलवडीकर, नजीर सर्जेखान, रवींद्र सावंत, सुधाकर ताडे, सौ.विजयमाला जाधव,सौ. सुनिता शिंगाडे, विजय देसाई, माजी संचालक मारुती वाशीकर यांचेसह सभासद उपस्थित होते. संचालक अशोक वसगडे यानी सुत्रसंचलन केले. संचालक विक्रांत दानोळीकर यांनी आभार मानले.

सुळकूड योजनेला पाठिंबा दर्शविणारा ठराव

चेअरमन दिलीप झोळ यांनी इचलकरंजी कराना सुळकूड योजनेतून पाणी मिळावे यासाठी सुळकूड योजनेला पाठिंबा दर्शविणारा ठराव सभेत मांडला.तसेच यासाठी कालावधी लागणार असलेने तोपर्यंत पंचगंगा व मजरेवाडी योजना सक्षम करावी असे मत मांडले.सर्व सभासदानी यास टाळ्याच्या गजरात संमती दर्शविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *