कबनुर /प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याबाबत मा.औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पगार मिळावा या व इतर मागण्यासाठी आज श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला.
सकाळी सर्व कामगार एकत्रित येऊन गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर सर्व कामगार येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात धरणे आंदोलन केले.यानंतर यासंदर्भात मा.न्यायालयाच्या आदेशाचाअवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगीतले.
सदर आंदोलनात कॉ.आप्पा पाटील,कॉ.औदुंबर साठे,निखिल शिंगे, जयश्री घाडगे,अमित चंदुरे, विठ्ठल कांबळे,अमित भरमगोंडा,रियाज पठाण,उत्तम गेजगे,नागेश कांबळे दिलीप शिंदे,मीनाक्षी कांबळे,दिलीप कोरवी यांचेसह सर्व कामगार उपस्थित होते.