कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी,5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे,जमाव जमविणे, सभा मिरवणुका घेणे यावर निर्बंध

इचलकरंजी(शैलेंद्र चव्हाण)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम ३७ चे पोटकलम (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये.ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी असा अहवाल सादर केला आहे की, कोल्हापूर जिल्हयात लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणेच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे सदरची परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्माच्या मध्ये तेढ निर्माण झालेली आहे. नमूद घटनेच्या पार्श्वभुमीवर एखादे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असे आदेशात म्हटले आहे.

तसेच ज्याअर्थी, कोल्हापूर जिल्हयामध्ये एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तेढ निर्माण होवून कोल्हापूर जिल्हयात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी करणे आवश्यक असलेचे पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, यांनी त्यांचेकडील क्र.जिवीशा/मपोका /बंदी आदेश / २६५३ /२०२३ दि.०६/०६/२०२३ रोजीच्या अहवालाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे

आणि ज्याअर्थी, कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी तसा आदेश जारी करणे जरुरीचे आहे,अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ ( The Maharashtra Police Act, १९५१) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये मला असलेल्या अधिकारास अनुसरून, मी, भगवान कांबळे, अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर, संपूर्ण कोल्हापूर जिल्हयामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (The Maharashtra Police Act, १९५१) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये दिनांक ०६/०६/२०२३ रोजी सायंकाळी १८.०० वा. पासून ते दिनांक १९/०६/२०२३ रोजी रात्रौ २४.०० वा. पर्यंत खालील वर्तन करण्यास मनाई करीत आहे.

कलम ३७ (१) अ ते फ :-
अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुया, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. (क) दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. (ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. (इ) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. (फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.

कलम ३७ (३) :-
कोल्हापूर जिल्हयामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणेचे संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण / उत्सव / जयंती / यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *