संविधान परिवाराच्या वतीने बलसागर भारत होवो पुस्तकाचे प्रकाशन

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील संविधान परिवार आणि कबनूर अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलसागर भारत होवो पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सिद्धार्थ काॅलनीतील समाज मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी पुस्तक प्रकाशनानंतर यातील काही भागाचे वाचन करण्यात आले. यावर प्रकाशक संजय रेंदाळकर यांनी भाष्य केले.

यावेळी अनुभव शिक्षा केंद्राच्या कबनूर शाखेसाठी कार्याध्यक्ष म्हणून प्रमोद आवळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसेच लवकरच सृजन वाचनकट्टा सुरू करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेचे ठरले. तसेच कोल्हापूर शहरातील दंगलग्रस्त गरीब व्यक्तींना मदत करण्याचे ठरले.

Advertise


यावेळी विद्याधर कांबळे, संविधान संवादक दामोदर कोळी, वासंती म्हेतर, नम्रता कांबळे, अमित कोवे, भाग्यश्री कांबळे, शरद वास्कर, सृजन, अमेया आदी उपस्थित होते. अनुभवचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *