गावच्या लेकीला मानाची माहेरची साडी,चंदूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

चंदूर-प्रतिनिधी

माजी सभापती महेश पाटील यांच्या संकल्पनेतून,चंदुर ग्रामपंचायतीच्या वतीने,चंदुर गावच्या लेकींना माहेरची साडी भेट देण्याचा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार चंदुर गावातील लेकीचा विवाह ठरल्यानंतर तिला ग्रामपंचायतीच्या वतीने मानाची माहेरची साडी भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शाहूनगर येथील सानिका मोकाशी व सानिया बिगुलजी या दोघींचा विवाह ठरला आहे.आज त्यांना चंदूर ग्रामपंचायतच्या वतीने मानाची माहेरची साडी भेट देऊन मानसन्मान करण्यात आला.

यावेळी चंदुरच्या सरपंच सौ.स्नेहल कांबळे,महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.वैशाली पाटील,सौ.योगिता हळदे, सौ. ललिता पुजारी, सौ.स्वाती कदम तसेच माजी उपसरपंच सौ. शकुंतला सिद्धापूरमठ (आऊ) आदी उपस्थित होत्या. यावेळी भागातील महिलानी ग्रामपंचायत कडून आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *