कबनूर हायस्कूल कबनूर,मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

कबनूर -प्रतिनिधी
कबनूर एज्युकेशन सोसायटी दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. त्यामध्ये कष्टकरी कामगार,शेतमजूर, शेतकरी यांची मुले शिक्षण घेवून सर्वच शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान निर्माण केले आहे.विद्यार्थ्याना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी संस्था अविरत धडपडत आहे असे प्रतिपादन कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांनी केले. ते कबनूर हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३.२४ या वर्षातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चेअरमन जयकुमार कोले

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापकं एस. एन. पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या वतीने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे लेझिम, झांज पथक व ढोल ताशांच्या गजरात तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पेन देवून स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिव सुभाष काडाप्पा

यावेळी सचिव सुभाष काडाप्पा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्वच क्रीडा, कला, शिष्यवृत्ती, वक्तृत्व, स्पर्धापरीक्षा इ. उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा तसेच विद्यालयतील असणा-या शालेय शिस्तीचे पालन करावे असे सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर, पर्यवेक्षक एस. जी. उगारे, उपस्थित होते.आभार एस. एस. चौगुले यांनी मानले तर सुत्रसंचालन पी. के. मेटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *