श्रीमंत गंगामाई हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
येथील श्रीमंत गंगामाई हायस्कुलमध्ये संविधान दिन मोठया उत्साहात संपन्न झाला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतीला अभिवादन करण्यात आले.तसेच गंगामाई माईसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोल पाटील व पथनाटयाच्या सर्व टिमचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस. गोंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सौ.ए.ए.रानडे यांनी व विदयार्थिनींनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.

संविधान संवादक अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात भारताचे सार्वभौमत्व ठरविणा-या संविधानाच्या प्रास्ताविकेची विविध उदाहरणे देवून मुलींशी संवाद साधत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुल स्पष्टीकरण दिले.यानंतर संविधानावर आधारित पथनाटय ‘हर घर संविधान’ राष्ट्र सेवा दल, इचलकरंजी यांच्या वतीने सादर करण्यात आले.

मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात देशाचा कारभार चालवणा-या संविधानाचं महत्त्व सांगून त्याचा आदर, सन्मान करुन त्याचे महत्व व अर्थ समजून घेवून संविधानिक मुल्यांचा जागर करण्याचे आवाहन केले.

यावेळी पर्यवेक्षक एस.व्ही. पाटील,विभाग प्रमुख आर. एन. हरेल यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आभार उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस. भस्मे यांनी मानले सुत्रसंचालन सौ. एस.पी. धातुंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *