श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स स्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीलाच व्यासांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक ए. एम. सावंत,श्री. ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व गंगामाई स्कूल कमिटीचे चेअरमन मारुतराव निमकर, विश्वस्त अहमद मुजावर व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

त्यानंतर संगीत शिक्षिका सौ.ए.ए रानडे यांनी गुरुमहिमा गीत सादर केले .आपल्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार व स्वागत मा.मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य श्री. आर. एस. पाटील यांनी करून दिला.यावेळी प्रमुख पाहुणे ए. एम. सावंत यांनी परमेश्वराला सुद्धा गुरूंची गरज असून आपले जीवन उन्नत करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे, गुरु शिष्यामध्ये गुरूंनी आपुलकी व विश्वासअर्हता निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन केले.

मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आपले आई-वडील, गुरूंचे महत्त्व सांगून आपण नेहमी शिष्याच्या भूमिकेत राहिले पाहिजे, आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती मग ती लहान किंवा मोठी असो ती गुरु असते.यावेळी बारावी कॉमर्स ची विद्यार्थिनी कु. सलोनी मडिवाळ हिने आपले मनोगत व्यक्त केले.

प्रशालेतील सर्व गुरुजन व कर्मचारी यांचा सत्कार सर्व मान्यवरांचा हस्ते श्रीफळ देऊन करण्यात आला.आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक श्एस. व्ही. पाटील ,विभाग प्रमुख शिंदे यांचे सह सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस.पी. धातुंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *