इचलकरंजी -शैलेंद्र चव्हाण
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम इचलकरंजी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांची निवड करण्यात आली.गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असणारी निराधार नागरिकांची प्रकरणे निकालात निघाली असून या योजनांच्या मंजुरी पत्र वाटपाचे काम सुरू झाले आहे.
यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या विविध योजनेतील विधवा, निराधार महिला, अपंग, वयोवृद्ध, निराधार महिला व पुरुषांनी शहापूर, तारदाळ, खोतवाडी, चंदुर, कबनूर, कोरोची या गावच्या लाभार्थ्याच्या मजुरी पत्रांचे वाटप प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडून करण्यात येणार आहे.तसेच इचलकरंजी शहराच्या लाभार्थ्यांनी इचलकरंजी संजय गांधी कार्यालय येथे सोमवार दिनांक ०३ जुलै २०२३ पासून वाटप सुरु करण्यात येणार आहे.

सदर मंजुरी पत्रे ही सर्व लाभार्त्यांनी तलाठी यांच्या कडून घ्यायची असून सर्व मंजूर लाभार्थ्यांनी ह्या मंजुरी पत्राचे झेरॉक्स व आधार कार्ड घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे.ही सर्व प्रक्रिया मोफत असून यासाठी कोणत्याही दलालाची मदत घेऊ नये व कोणालाही पैसे देऊ नये. तसेच याबाबतीत काही समस्या असल्यास संजय गांधी निराधार योजना कार्यालय इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन समिती अध्यक्ष अँड.अनिल डाळ्या यानी केले आहे.