बालोद्यान संस्थेमुळे  वंचित मुलांना स्थैर्य-मृणाल देसाई

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण

समाजातील निराधार वंचित आणि भटक्या मुलांना स्थैर मिळवून देण्यासाठी बालोद्यान संस्थेचे एक तपहून अधिक काळ सुरू असलेले काम गौरवास्पद आहे. समाजाच्या विश्वासास पात्र ठरून सुरू असलेले संस्थेचे हे काम नक्कीच दिशादर्शक आहे असे उद्गार फाउंडेशन फॉर ब्राईट फ्युचर अमेरिका या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मृणाल देसाई यांनी काढले.

विद्यार्थी विकास प्रबोधिनी संचलित बालोद्यान या संस्थेच्या इचलकरंजी शहरातील कार्यालयाचे उद्घाटन मृणाल देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे, डी के टी  संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ सपना आवाडे,डॉ रेखा टेंगशे,सौ भारती चंगेडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक संजय खूळ यांनी केले.

अ.लाट येथे बालोद्यान ही संस्था 2009 पासून कार्यरत आहे. 50 मुलांसाठी या संस्थेने वस्तीग्रह उभारले असून आणखीन 50 मुलांच्या वस्तीग्रहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरातील नागरिकांना संपर्क होण्यासाठी संस्थेचे कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. 

याप्रसंगी बोलताना मृणाल देसाई म्हणाल्या, ” संस्थेशी मी गेली दहा वर्षे जोडली गेली आहे. परंतु प्रत्यक्षात संस्था पाहण्याचा योग आज या निमित्ताने आला. समाजातील गरजू मुला मुलींना आश्रय देऊन त्यांचे उज्वल भवितव्य घडवण्याचे आदर्श काम ही संस्था करत आहे. संस्थेला या पुढील काळात ही नेहमीच सहकार्य राहील”.

संस्थेचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकांनी या संस्थेला बळ दिले आहे .या संस्थेने  अत्यंत पारदर्शी कारभार चालवून मुलांना उभे करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणा नाही मोठे बळ दिले आहे. त्यामुळे अनेक गरजू मुलांना देशातील सर्वोच्च शिक्षण घेता येऊ लागले आहे. संस्थेच्या या कार्यात इचलकरंजी शहराचा खूप मोलाचा वाटा आहे. इचलकरंजी कार्यालयाच्या माध्यमातून तो या  पुढील काळातही अधिक दृढ होत राहील असा आम्हाला विश्वास आहे.

कार्यक्रमास डॉ. पी.जे. बडबडे, डॉ जे.पी. बडबडे डॉ.कुबेर मगदूम मनोरंजन मंडळाचे संचालक संजय होगाडे, माजी नगरसेवक अमृत भोसले, संजय चौगुले, डॉ विजय मगदूम, डॉ.चैताली मगदूम, आदिनाथ बँकेचे संचालक अनिल बंम्मनावर, मोहन चौगुले, सायली होगाडे, मनीष मुनोत, सुचेता दिवाणी,  अरुण आवटी संस्थेचे संचालक सुरेश कारदगे, किरण चौगुले, मनोज शेडबाळे, शंकर बिल्लूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *