कबनूर स्मशानभूमीत चोरी करणाऱ्या सर्व चोरांचा शोध घेण्याची मागणी,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर कोल्हापूर ओढ्यावरील स्मशानभूमीतील शवदाहीनी, चोरणाऱ्या सर्व चोरांचा शोध घेऊन, आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना कबनूर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.निवेदन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी स्वीकारले.

Advertise

सदर निवेदनामध्ये कबनूर स्मशानभूमीमध्ये बीडाच्या 2 शवदाहिनी 28 जून रोजी चोरीस गेल्या होत्या.त्या शवदाहिनी धुळेश्वर नगर मधील एका स्क्रॅप गोडाऊन मध्ये सापडल्या आहेत.सदर स्क्रॅप विक्रेता चोरीचे सामान नेहमी विकत घेत असतो.अशी बरीच प्रकरणे घडली आहेत.सदर चोरी प्रकरणात मोठी टोळी असण्याची शक्यता असून त्या टोळीवर कडक कारवाई करावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.


यावेळी माजी उपसरपंच निलेश पाटील,प्रकाश इंगवले,विद्यासागर चराटे,प्रशांत जगताप,निशिकांत पाटील,बबलू सनदी,अजित खुडे शांतिनाथ कामत,संजय सुतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *