इचलकरंजी-प्रतिनिधी
जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम,कोल्हापूर जिल्हा सेवा समिती,इचलकरंजी सेवा केंद्राच्या वतीने सामूहिक पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम,इचलकरंजी सेवाकेंद्राच्या वतीने श्री लिलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले.
महंतेश कोकळकी व सौ अनुराधा कोकळकी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यानंतर श्री लिलामृत या ग्रंथाचे पारायण करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता सांजारतीने करण्यात आली.यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी गणपती गवळी,आप्पासो कोणे,भूषण माने,राम बन्ने,राहुल बन्ने,ललिता दौंडे, रेश्मा ठिकणे, अलका कुरकुटे, सुजाता खारगे,सुमन बन्ने,शारदा बन्ने,शालन चव्हाण,चंद्रकांत आगम, निलेश चव्हाण,सुप्रिया चव्हाण,पौर्णिमा बिडकर आदी भक्तगण उपस्थित होते.