छाया कॉर्नर नागरी सह.पत संस्थेची ३५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधी
सहकार क्षेत्रातील यशस्वीपणे घौडदौड,सभासदांच्या विश्वास यामुळे सभासद तसेच अनेक सहकारी संस्थाना अर्थिक पाठबळ देऊन,त्यांना पुनरुजीवन करून चालना देण्याचे काम संस्थेचे संस्थापक श्री सत्यनारायण डाळया यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श सहकारी संस्था म्हणून छाया कॉर्नर नागरी सहकारी पत संस्थेचे नाव अग्रकमाने घ्यावे लागेल असे गौरोवोदगार इंटक नेते श्री शामराव कुलकर्णी यांनी काढले. तसेच या समाजसेवेची परतफेड म्हणून संस्थापक सत्यनारायण डाळया यांचा सर्व सभासदांच्या वतीने दि डेक्कन प्रोसेसर्सचे चेअरमन बापूसो तेरदाळे यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

येथील छाया कॉर्नर नागरी सहकारी पत संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.स्वागत व प्रास्तावीक संचालक शाम डाळया यांनी केले. संस्थेचे मार्च २०२३ अखेर वसुल भागभांडवल ५९ लाख, फंडस् २ कोटी १४ लाख, ठेवी ७ कोटी ३७ लाख, गुंतवणुक ६ कोटी ६३ लाख, कर्जे ३ कोटी ९५ लाख, खेळते भांडवल ११ कोटी ६२ लाख असून मार्च २०२३ अखेर संस्थेस ८ लाख नफा झालेचे व सन २०२३ या सालाकरीता संस्थेच्या सभासदांना ८ टक्के इतका डिव्हीडंड देण्याचे संस्थेचे चेअरमन श्री सचिन डाळया यांनी अहवाल वाचन करताना सांगितले.

Advertise

विषयपत्रिकेवरील विषयवाचन मॅनेजर सुनिल भोसले यांनी केले. यास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.अहवाल सालात दिवगंत झालेल्या संस्थेचे सभासद, हितचिंतक, इतर ज्ञात, अज्ञात, भारतीय जागतीक किर्तीचे शास्त्रज्ञ, थोर साहित्यिक,राजधुरंधर नेते, सामाजीक कार्यकर्ते यांना संचालक सौरभ जाधव यांनी सभेत श्रध्दांजली अर्पण केली .

सुभाष जाधव यांची क.आ.जनता बँकेच्या संचालकपदी फेरनिवड, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी संस्थेचे संचालक श्रीकांत सारडा यांची निवड झालेबद्दल सत्कार करणेत आला .

Advertise

या सभेस संस्थापक श्री सत्यनारायण डाळया,सन्मती बँकेचे व्हा. चेअरमन एम के कांबळे,सी ए.एन ए वसुदे, मनोहर हिराणी, महेश खंडेलवाल, व्हा. चेअरमन सौ भारती सुर्यवंशी, नझीर मैंदर्गी, नागराज शेट्टी, विश्वनाथ भोरे, सतिश काळे, सौ अंजली सांवरे सर्व सभासद मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री सुरेंद्र सुर्यवंशी यांनी केले.आभार संचालक अनिल मगदूम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *