कबनूर-प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत,”माझी माती माझा देश”अभियान कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे,पंचगंगा सह साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील,भाजपा जेष्ठ नेते बी.डी.पाटील,जलस्वराज्य प्रणेते सुधाकरराव मणेरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले,शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार,शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजीव पाटील,वीरपत्नी अशरफबी काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर शिलालेखाचे अनावरण करण्यात आले.यानंतर पंचप्रण शपथ घेण्यात आली.यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला.


तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या,शूरवीरांचे स्मरण व्हावे,शालेय वयातच देशप्रेम दृढ व्हावे,व शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा ,समूहगीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये 15 शाळांतील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा रोख रक्कम,शिल्ड, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,नृत्य,वक्तृत्व आदी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला.याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील,सरपंच सौ शोभा पोवार,उप सरपंच सुनील काडाप्पा,ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग,पंचगंगा साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील,लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील,मंडल अधिकारी राजू बावणे,तलाठी एस.डी.पाटील,एन. एन. काझी,बबन केटकाळे,बी.एन. पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील,प्रवीण जाधव,मधुकर मणेरे,सुलोचना कट्टी,रोहिणी स्वामी,रजनी गुरव,सुधाराणी पाटील,वैशाली कदम,अर्चना पाटील,निशिकांत पाटील,बाळू कामत यांसह विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले,आभार सुनील काडाप्पा यांनी मानले.
