कबनूर-प्रतिनिधी
कबनूर (ता.हातकणंगले) येथील जलजीवन योजनेचा जलकुंभ भूमिपूजन व पाया खुदाई कार्यक्रम सोमवार दिनांक 4 सप्टेंबर सकाळी 9 वाजता, मराठी शाळा कबनूर येथे, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अमृत हस्ते संपन्न होणार आहे.तर पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

केंद्राच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कबनूर गावासाठी सुमारे 29 कोटीची जलजीवन योजना मंजूर झाली आहे.या योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने,खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक,आमदार प्रकाश आवाडे,माजी खासदार राजू शेट्टी,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार अशोकराव जांभळे,भाजपा नेते बी.डी.पाटील,जेष्ठ नेते सुधाकरराव मणेरे,माजी जि.प. सदस्य जयकुमार कोले,माजी ता.पं. सदस्य जयकुमार काडाप्पा,संचालक बबन केटकाळे,संचालक प्रमोद पाटील,लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक सरपंच तथा जलजीवन मिशन अध्यक्ष शोभा पोवार,सचिव तथा ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग,उपसरपंच सुनील काडाप्पा,व सदस्य यांनी केले आहे.