इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या भव्य कार्यालयाचा नुतनीकरण उद्घाटन सोहळा आयोजित केला असून सदर कार्यक्रमास मा.ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आम.सुरेशराव हाळवणकर असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.असे कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपा शहराध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
०६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पक्ष स्थापने पासून आज पर्यंत इचलकरंजी भाजपचे एकूण १४ अध्यक्ष झाले. शहरांमध्ये स्वतः चे पक्ष कार्यालय असावे यासाठी कार्यकत्यांनी १९८३ साली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने निधी गोळा करून व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कार्यालय खरेदी केली. एक छोटंसं रोपट लावले होतं त्याचं आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. जसं जसे कार्यकर्ते वाढत गेले तसं तसे पक्ष कार्यालयाची व्याप्ती वाढत गेली.१९८३ ला पश्चिम महाराष्ट्रात पुणे नंतर इचलकरंजीचे स्वमालकीचे भाजप कार्यालय स्थापन झाले.
या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व भाजपा कार्यकर्ते ,पदाधिकारी आजी माजी नगसेवक व इचलकरंजी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केले आहे.या पत्रकार बैठकीस भाजपा जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, पांडुरंग म्हातुकडे, महिला अध्यक्ष सौ. पूनम जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण पाटील, सरचिटणीस अरुण कुंभार, अमर कांबळे, शहाजी भोसले, अमृतमामा भोसले, उमाकांत दाभोळे, प्रदीप मळगे, उत्तमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.