गरीब व गरजूंना चांगल्या सेवा देऊन सेवासदन हॉस्पिटल नावारूपाला आणणार-अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीनचा शुभारंभ

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
सेवा सदन निरामय हॉस्पिटल हे गरीब व गरजू लोकांना चांगल्या सुविधा देऊन सेवासदन हे नाव शहरासह जिल्ह्यात नावारुपास आले आहे.सेवा सदन निरामय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन आणण्यात आली आहे.इचलकरंजी शहरात असे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असलेले हे सिटीस्कॅन मशीन प्रथमच सेवासदनच्या सेवेत रुजू झाले आहे.


या सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते झाले.यावेळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, यांच्यासह डॉक्टर बोरगावे, डॉक्टर ढवळे,डॉ. बनगे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर रुग्णालयातील प्रमुख व ऑफिस स्टाफ उपस्थित होता.

सेवासदन हॉस्पिटल

यानंतर डॉ. बोरगावे,डॉ. बनगे पोलीस निरीक्षक ताशीलदार,सत्यवान हाके यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ बोरगावे यांनी 2003 साली लाईफ लाईन या माध्यमातून सुरू केलेले हे हॉस्पिटल आता वीस वर्षात मोठे झाले आहे.त्याचा विस्तार ही भविष्यात आम्ही मोठा करणार असून आमचे मोठे संकल्प आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. तराळ यांनी निरामयची स्थापना कशी झाली याची पूर्णपणे माहिती दिली.

Advertise

यानंतर या नव्या सिटीस्कॅन मशीन ची माहिती रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉक्टर बावणे,व सोमाणी यांनी दिली.इचलकरंजी शहरात प्रथमच हे मशीन येत असल्याचे सांगून या रुग्णालयाने आतापर्यंत शंभर बायपास सर्जरी केल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.यापुढे गरीब व गरजू लोकांना चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देऊन त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हे सेवासदन प्रामाणिकपणे प्रयत्न करून, सेवासदन या नावाला शहरात व जिल्ह्यात लौकिक प्राप्त करून देईल यासाठी आम्ही मोठे संकल्प केले आहेत असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.

या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजना यासह विविध योजना राबविण्यात येत असून पाच लाखापर्यंत कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो असेही डॉक्टर बावणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *