श्री आदिनाथ बँक शाखा विस्तार करणार-चेअरमन सुभाष काडाप्पा

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
येथील श्री आदिनाथ को – ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२२-२३ सालाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व मार्गदर्शक प्रकाशराव आवाडे उपस्थित होते.

बँकेचे सभासद यशवंत दाडमोडे यांनी या वर्षाचा डिव्हीडंड बँकेच्या इमारत निधीस वर्ग करून या निधीचा वापर करून बँकेचे कॉन्फरस हॉल बांधावे व पुढील वर्षी चांगला डिव्हीडंड द्यावा अशी सुचना मांडली त्यास सभेने मंजूरी दिली.सुरुवातीस आद्य तिर्थकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांचे फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन सुरुवात झाली.स्वागत ज्येष्ठ संचालक बाळासो चौगुले यांनी केले.श्रध्दांजली ठराव श्रेणीक दादासो मगदूम यांनी मांडला.

Advertise

अध्यक्षीय भाषणात चेअरमन सुभाष आदिशा काडाप्पा यांनी ८% डिव्हडंड जाहिर केला.अहवाल सालातील बँकेच्या आर्थिक बाबींचा आढावा घेतला. तसेच सुरुवातीच्या १००० /- रूपये शेअर्स वरती बँकेने आतापर्यंत डिव्हीडंड रूपाने १९२० /- रूपयेचा परतावा दिलेचे नमुद केले..

सध्याच्या बँकींगमधील रिझर्व्ह बँकेकडील बदल व त्याअनुषंगाने दंडात्मक कारवाई वाढलेचे दिसून येते. परंतु आपल्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या Financially Sound and Well Managed (FSWM) -या बॅकींगमधील चांगली गुणवत्ता व व्यवस्थापन निकषामध्ये खरी उतरत आहे. यामुळे बँकेला नविन शाखा विस्तार करणेस परवनागी मिळाली आहे त्यानुसार आपली बँक लवकरच शाखाविस्तर करत असलेचा संकल्प तसेच मुख्य शाखेच्या इमारतीत दुस-या मजल्यावरती कॉन्फरन्स हॉल बांधकाम करणार असलेचे सांगितले.

शेवटी सभासदांना सर्व विषयास मंजूरी देणेचे व आवाडे परिवाराचे स मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.यावेळी बोलताना प्रकाश आवाडे यांनी स्व. आप्पासो मगदूम व व्हा. चेअरमन स्व. बाळासो केटकाळे यांची आठवण केली. डिझीटल बँकींगची गरज असलेचे व त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपग्रेड खर्च जादा असून यासाठी व्यवसाय वाढवून त्याची भरपाई करावी असे सुचित केले.

नोटीस वाचन उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी केले.सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजूरी दिली.सभेमध्ये सौ. वैशालीताई आवाडे यांची दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशन लि.मुबई या बँकांच्या राज्यस्तरीय फेडरेशनवरती उपाध्यक्ष झालेबद्दल सत्कार करणेत आला. स्वप्नील आवाडे यांची क.आ. इचल जनता बँकेच्या चेअरमनपदी निवडीबद्दल सत्कार करणेत आला. राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार करणेत आला.

सभासद व कर्मचारी कल्याण योजने अंतर्गत बँकेचे सभासद सुनिल ढोणे यांची कन्या श्रध्दा ढोणे व सभासद संजय पाटील याची कन्या सिध्दी पाटील यांचे शालेय परीक्षेतील विशेष यशाबद्दल तर बँकेचे उपमुख्य अधिकारी जयकुमार उपाध्ये व ईडीपी मॅनेजर संतोष रायनाडे यांचे साफ्टवेअर कार्यान्वित करणेकामी विशेष प्रयत्न तर आदर्श कर्मचारी म्हणुन सचिन कुडचे यांचा सत्कार करणेत आला.

सदर सभेस संचालक श्री कुंतिलालजी पाटणी, अभयकुमार मगदूम, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, श्री. श्रेणिक मगदूम, अनिल बम्मण्णावर श्री संपत कांबळे श्री. गुरुनाथ हेरवाडे, श्री. सुकुमार पोते श्री. सुचित हेरवाडे, तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, डॉ. जयकांता बडबडे बीओएम सदस्य श्री. उमेश कोळी, सतिश मगदूम, अॅड. पवनकुमार उपाध्ये तसेच माजी चेअरमन बाळासो सिध्दाप्पा चौगुले, सभासद शामराव नकाते, आप्पासो देवमोरे, यशवंत दाडमोडे,महावीर बरगाले बाबू सग्गे,प्रधान माझी, मोहन चौगुले, सीईओ जिवंधर चौगुले मॅनेजर निलेश बागणे उपस्थित होते.सभेचे सुत्रसंचालन श्री तिर्थकर माणगांवे यांनी केले.आभार संचालक मधुकर मणेरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *