कबनूर-प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले)येथील गाव कामगार तलाठी कार्यालयातील कोतवाल,शिवाजी उर्फ आप्पासाहेब चव्हाण यांना महसूल विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल, महसूल दिनानिमित्त आदर्श कोतवाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामुळे कबनुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार,इचलकरंजी उपविभागीय अधिकारी सौ मौसमी चौगुले-बर्डे,अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांचे हस्ते गौरवण्यात आले.
जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे लक्षात घेता कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती,महसुली वसुली,मदतकार्य,निवडणूक,तसेच दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल,व महसूल विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रामाणिकपणा व शिस्तबद्ध कामाचा सन्मान
कोतवाल शिवाजी चव्हाण हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असून, गावाचे लाडके कोतवाल म्हणून त्यांची ओळख आहे.कामाचा तात्काळ निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे.त्यामुळे त्यांच्या कामाची नेहमीच चर्चा असते.यापूर्वी देखील त्यांना उत्कृष्ट कामाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना पुन्हा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांना तलाठी एस.डी.पाटील,मंडल अधिकारी राजू बावणे,जे.आर.गोन्सालवीस,यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे.
