कर्जदार हक्क बचाव समितीच्या वतीने संविधान दिन साजरा

इचलकरंजी -प्रतिनिधी
भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी त्याचा अभ्यास करून आपला देश अर्थिक महासत्ता कसा होईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.तसेच नागरिकांनी संविधानाने दिलेल्या हक्काचा वापर करून निर्भीड बनले पाहिजे.असे प्रतिपादन कर्जदार हक्क बचाव समितीचे अध्यक्ष सुधीर उत्तुरे यांनी केले.ते संविधान दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी अजित लटके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक समिती सचिव संजय जकाते यांनी केले.उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सतीश लाटणे, निर्मल कांबळे, नरेंद्र भोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना अजित लटके यांनी कर्जदार हक्क बचाव समितीच्या कामाचे कौतुक करून,गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती करत असलेले कार्य उल्लेखनीय असून अशाच प्रकारे नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.

संविधान प्रस्तावनेचे आबासो निऊंगरे यांनी वाचन केले.याप्रसंगी महेशराव धारवट, संजय गावडे, बाळासो कोळी,रवी गड्डे ,अनिल गुरव आदी उपस्थित होते.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *