कबनूर मध्ये सुपरस्टार सर्कस दाखल,10 जूनला शुभारंभ

कबनूर/वार्ताहार
कबनूर मध्ये सुपरस्टार सर्कस दाखल झाली असून या सर्कसचा भव्य शुभारंभ दिनांक 10 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार असून माजी आमदार सुरेशराव हाळवणकर,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील,पंचगंगा कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे,यांचे हस्ते होणार आहे.यावेळी माजी सभापती रेश्मा सनदी ,संचालक प्रमोद पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


सध्या सर्कस दुर्मिळ होत असून कोरोना नंतर कबनूर सह परिसरात पहिल्यांदाच सर्कस दाखल होत आहे.यामध्ये प्रामुख्याने वॉटर प्रूफ तंबू,हवाई झोका,चिंपांझी सारखा माणूस,जिमन्यास्टिक,रंगीत लायटिंग,लहान मुलांसाठी मोटू पतलू,मिकी माउस,6 जोकर यांसह सुमारे 100 कलाकार आहेत.
ही भव्यदिव्य सर्कस कबनुरात दाखल झाली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्कस मालक प्रकाश माने,विजय माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *