संजय तेलनाडे घेणार आज निर्णयअपक्ष निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी

इचलकरंजी/प्रतिनिधी
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी कडून संजय तेलनाडे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती.मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय तेलनाडे आज आपला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदान संघात निवडणुकीपूर्वी संजय तेलनाडे यांच्या नावाची हवा होती.त्यादृष्टीने त्यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांना हद्दपार करण्यात आले.

हद्दपारीच्या कुटणीतीमुळे तेलनाडे थांबतील असा कयास होता.मात्र त्यांच्या पत्नी सौ.स्मिता तेलनाडे यांनी मतदार संघ पिंजून काढून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व तेलनाडे फाऊंडेशन च्या माध्यमातून मदतही केली.

संजय तेलनाडे महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवतील अशी सगळ्यांची इच्छा होती.मात्र त्यांना तिकीट न दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले असल्याचे समजते.तेलनाडे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी सर्वांनी मागणी केल्याने याबाबत बैठक घेऊन ते आपला निर्णय घेणार असल्याचे समजते.

त्यामुळे संजय तेलनाडे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कारण त्यांच्या उमेदवारीमुळे अनेकांना घाम फुटणार आहे हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *