मेष
नोकरी व्यवसायात भरभराट होईल.नवीन कामांना चालना मिळेल. प्रवास घडेल.नातेवाईकांना भेटाल.
वृषभ
व्यवसायात प्रगती कराल.सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावाल.विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल दिवस.
मिथुन
तुमच्या चोख कामामुळे तुमची जबाबदारी वाढेल.नवीन संधी मिळेल. नवीन नोकरी शोधणार्यांना नोकरी मिळेल.
कर्क
आज तुमचा दिवस सुखकारक जाईल. ग्रहांची साथ लाभेल.सकारात्मक विचार करा,यश मिळेल.
सिंह
महत्वाची कामे हातावेगळी करा.आज रखडलेली कामे पूर्ण होतील.काम करताना घाई गडबड करू नका.
कन्या
आज प्रवासाचा योग आहे.एखादी परीक्षा द्याल.त्यात यश मिळेल.जोडीदाराशी आनंदित रहाल. प्रवासात काळजी घ्यावी.
तूळ
तुमच्या अडचणी दूर होतील.तुमचा उत्साह वाढेल.मन आनंदी राहील.कामे वेळेत पूर्ण होतील.मनोबल चांगले राहील.
वृश्चिक
आजचा दिवस आनंददायी असेल.विवाह जुळतील.विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल.सावधानता बाळगावी लागेल.
धनू
कामाचा ताण वाढल्याने अस्वस्थता जाणवेल.पण शांतीने काम करा.घरातील लोकांशी चांगले वागा.ऑफिस चा राग घरी काढू नका.
मकर
आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.लॉटरी लागण्याची शक्यता.आर्थिक स्थिती उत्तम राहील.
कुंभ
नोकरीत बढती मिळेल.सरकारी नोकरांना गोड बातमी समजेल.धनप्राप्ती होईल.चिडचिड टाळा.
मीन
पुढचा विचार करून दुःखी न होता आजचा विचार करून आनंदी राहा.मुलांशी गप्पा मारा.त्यांच्या अडचणी समजून मार्गदर्शन करा.