राशिभविष्य 28 सप्टेंबर

anonymous female fortune teller shuffling tarot cards at table

मेष
आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला दिवस आहे.नोकरीत यश मिळेल. इतरांचा सल्ला उपयुक्त ठरेल. उत्साह वाढेल.

वृषभ
आज प्रवासाचे योग आहेत.रखडलेली कामे पूर्ण कराल.
बुद्धीचातुर्याने काम कराल.

मिथुन
आपला दिवस सामाजिक कामात व्यस्त राहील.मानसन्मान मिळेल.नवीन भेटीगाठी होतील.

कर्क
आज तुमची द्विधा मनस्थिती जाणवेल.आजची कामे आजच पूर्ण करा.

सिंह
तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्याल.धार्मिक कामात हजेरी लावाल.धनलाभ होईल.

कन्या
नोकरीत बदलीचे संकेत.व्यवसायात नवीन योजना आखाल.कामानिमित्त प्रवास घडेल.विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस.अभ्यास कराल.

तूळ
तुमचा शांत स्वभाव सगळ्यांचे मन जिंकतो त्याचा प्रत्यय आज येईल.सकाळी लवकर कामे झाल्याने दिवस निवांत जाईल.टीव्ही बघण्यात वेळ घालवाल.

वृश्चिक
दैनंदिन कामात बदल होईल.कामाचा ताण वाढेल.मालमत्ता विषयक कामे आवरून घ्या.

धनू
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद वार्ता घेऊन येईल.प्रवासाचे योग संभवतात.आज देवीचे दर्शन घ्याल.प्रवासात काळजी बाळगा.

मकर
नातेवाईकांची भेट होईल.पैशाची आवक चांगली असेल.वातावरण आनंदी राहील.

कुंभ
आपल्या कामात लक्ष घालाल.जुन्या नोकरीची चिंता व नवीन नोकरी संबंधी प्रयत्न जोमाने कराल.आनंदी वातावरण राहील.

मीन
आज कामे वेळेत होतील.कामाचा ताण कमी होईल.धार्मिक कामात लक्ष घालाल.नोकरीत सुवार्ता समजतील.विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *