सकाळी म्हणा हा मंत्र,स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील

श्री स्वामी कृपातिर्थ तारक मंत्र 

निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी 
अशक्यही शक्य करतील स्वामी॥१॥

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला ॥ २ ॥ 

उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा 
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा|| ३ |

खरा होई जागा श्रध्देसहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त

कितीदा दिला बोल त्यांनीच हात ,नको डगमगू स्वामी देतील साथ|।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ,स्वामीच या पंचप्राणामृतात

हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती
न सोडी कदा स्वामी जय घेई हाती ।। ५ ।। 

श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे,जळत्या उदबतीची राख पेत्यातील पाण्यात पडेल 
अशी ठेवावी पाणी तीर्थ म्हणून घ्यावे. तारकमंत्र दररोज सकाळी एकदा म्हणावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *