ही तुझी आठवण टाळली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
आग पाण्यास या लागली पाहिजे
आसवांची नदी पेटली पाहिजे
फार झाल्या आता ओळखी-पाळखी
मी तुला पाहिले तू मला पाहिले
त्या क्षणी काय झाले कळेना मला
पाहताना तुला जीव गेला तरी
जीव गेल्याविना राहवेना मला
मोगऱ्याला तुझे रूप आले सखे
पारिजातासही गंध आला तुझा
काय सांगू तुला हाय माझे फुला
एकही फूल साधे मिळेना मला
गद्य लिहले तरी त्यात दिसतेस तू
पद्य लिहले तरी त्यात दिसतेस तू
कागदांच्या सुरू जाहल्या चौकश्या
काय उत्तर लिहू हे कळेना मला
लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा
मी म्हणालो असुद्या गुन्हा तर गुन्हा
मुश्किलीने मिळाली मला कैद ही
देव जामीन आता नसेना मला
फार झाल्या आता ओळखी-पाळखी
एक व्यक्ती खरी आपली पाहिजे
पाहिजे पाहिजे पाहिजे पाहिजे
माणसाची नियत चांगली पाहिजे
झोपड्यांची गुढी उंच गेली किती
बंगल्याना शरम वाटली पाहिजे
गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ
तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ
तुलाच लिहण्यासाठी होता जन्म सखे
आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे
ही तुझी आठवण टाळली पाहिजे
पाहिजे पाहिजे पाहिजे पाहिजे
माणसाची नियत चांगली पाहिजे
Written by गझलकार वैभव जोशी