या दिवशी लागणार आचारसंहिता दिवाळीनंतर मतदान…

Online24taasteam
राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 12 ऑक्टोबरला आलेला दसरा उत्सव होताच कोणत्याही क्षणी लागू होईल आणि मतदान मात्र दिवाळीनंतर घेतले जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाले.

ही निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, अशी सर्वपक्षीय मागणी पुढे आली असली, तरी त्याबद्दलचा निर्णय आयोगाने घेतलेला नाही. निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या सूचनांचा संदर्भ लक्षात घेता 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान घेतले जाऊ शकते. त्यानुसार आचारसंहिता 18 ऑक्टोबरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *