कबनूर-प्रतिनिधी
कबनूर फॅक्टरी रोड वरील एम लिकर्सचे व्यवहार बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला,मा.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी स्थगिती आदेश दिले.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील काढले.त्यामुळे दुकान पूर्ववत सुरू झाले.

ग्राहकांची पुन्हा सोय
कबनूर सह आसपासच्या परिसरात केवळ एकमेव देशी विदेशी दारूचे दुकान आहे.ऐन पावसाळ्यात दुकान बंद झाल्याने मध्यप्रेमींची निराशा झाली होती.अखेर शुक्रवारी दुकान सुरू झाल्याने पुन्हा मध्यप्रेमींनी गर्दी केली होती.