इचलकरंजी/(शैलेंद्र चव्हाण)
येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील महादेव राजाराम जामदार, यांच्या ऑफिस व गोडाऊनचा कडी कोयंडा उचकटून,रोख रक्कम ,स्टार कंपनीचे कपाट असा एकूण 1लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता.याप्रकरणी पवन सुरेश गवळी(जयभीम नगर झोपडपट्टी, इचलकरंजी) बंडा पाटील(जयभीम नगर झोपडपट्टी) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर,गवळी व एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले असून सुमारे 70,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तीन ते चार जून या दरम्यान जामदार यांच्या ऑफिस,व गोडाऊनचे कडी कोयंडा उचकटून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून,सुमारे एक लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.

यानंतर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार पवन गुरव यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,सदरचा गुन्हा पवन गवळी याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली.सदर अनुषंगाने सापळा रचून यातील संशयित आरोपी पवन गवळी व एका अल्पवयीन बालकास मोटरसायकलसह ताब्यात घेतले असता,त्याच्या अंगझडतीत, मोबाईल,मोटार सायकल सह रोख रक्कम असा सुमारे 70,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील,पो.अंमलदार सागर चौगले, पवन गुरव, सुनिल बाईत, गजानन बरगाले, विजय माळवदे, सतिश कुंभार, अरविंद माने, प्रविण कांबळे यांनी केली.