हृदय फौंडेशनमार्फत दूर्गम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चंदूर-प्रतिनिधी
चंदूर(ता.हातकणंगले) येथील हृदय फौंडेशनचे संस्थापक सदस्य अमित कांबळे,महेश भोसले,अवधूत परीट,मनोज पाटील, सचिन हुंदळेकर,ओमकार पाटील(जिताई),प्रतिक पाटील(कुपवाडे),सुरज होनवाडे,,शुभम माने,निलेश परीट,राहूल वाघमोडे,विनायक सुतार,रामचंद्र मिठारी,संदीप यादव,सचिन पाटील, चंद्रकांत मडीवाळ,विवेक कांबळे,शाहूनाथ मांगलेकर,अनिल आंबी,सागर माळी,शिरीष पाटील, देवराज पाटील(कुगे) यांच्या संकल्पनेतून
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील, पश्चिम-वायव्य दिशेस असणाऱ्या शित्तुर-वारूण ग्रामपंचायत अखत्यारीत राऊतवाडी व पाटीलवाडी तसेच उखळू ग्रामपंचायत अखत्यारीत अंबाईवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना फौंडेशनच्या वतीने शालेय साहित्य देण्यात आले.

शिकण्यासाठी डोंगर पार
दोन तीन किलोमीटर ची पायपीट करत डोंगर पार करत येणारी लहान लहान मूलं, ना डांबरी रस्ता, ना पायात चप्पल, ना काही भौतिक सुविधा किमान 16,20,30 असा पट असणाऱ्या पहिली ते पाचवी पर्यंत शाळेमध्ये सुरेश महींदकर ,अभिजीत कांबळे,विशाल राठोड यांसारख्या हाडाच्या शिक्षकांमुळे परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेते या उक्तीप्रमाणे शाळेमध्ये शिक्षकसंख्या कमी असूनही बहूवर्ग अध्यापन पद्धतीने एका शिक्षकाला सर्व वर्गाला शिकवावे लागते.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना फाऊंडेशनचे सदस्य

हुशार विद्यार्थी
तसेच कोणत्याही सोयीसुविधा नसताना प्रचंड इच्छशक्तीच्या जोरावर पहिली दुसरीचे विद्यार्थी अस्खलितपणे इंग्लिश भाषा वाचतात,हे पाहून सर्व सदस्यांना आश्चर्य वाटले.

याप्रसंगी अंबाईवाडीतील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बैकर,शंकर सपकाळ, सुरेश व्हडे,राजाराम व्हडे,बंडू सपकाळ, गणेश पेजे तसेच शाळेचे सर्व माजी विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *