इचलकरंजी मतदार संघात आवाडेंच्या विकास कामांचीच चर्चा

इचलकरंजी/प्रतिनिधी
सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल बॅनरबाजी करण्यात धन्यता मानत आहेत.याउलट आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी विकास कामांच्या माध्यमातून विकास करण्यावर भर दिल्याने राहुल आवाडे यांची चर्चाच भागाभागात आहे.

विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी देव पाण्यातठेवले असून बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रचार करण्याचा सपाटा लावला होता. मात्र डिजिटल वरील नेते अनेकांना ओळखत नसल्याचे चित्र आहे.

लोकांच्या कधीही उपयोगी न पडणाऱ्या एका इच्छूक उमेदवाराने
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही वस्तू वाटून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला होता.तर जागोजागी डिजिटल लावून प्रचार केला होता.मात्र सुजाण नागरिकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेळलेला हा डाव असून त्याच्या भेटवस्तूचा,व बॅनरबाजीचा खरा डाव ओळखला आहे.

कर्जदार एकवटणार
एक इच्छूक उमेदवार,पदाधिकारी असलेल्या एका वित्त संस्थेत कर्जदार मेटाकुटीला आले आहेत.तर अनेकांच्या मालमत्ता जप्तीचा सपाटा लावून त्यांना बेघर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे पीडित कर्जदार या उमेदवाराला तिकीट मिळण्याआधीच त्याच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी सज्ज झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राहुल आवाडे यांनी अलीकडच्या काळात विकास कामांचा सपाटा लावला आहे.वर्षानुवर्षे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागले आहेत.त्यामुळे विकास कामांच्या जोरावर ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.त्यांच्या या निस्वार्थ कामामुळे नागरिक मनापासून त्यांना धन्यवाद देत आहेत.

एकंदर इचलकरंजी मतदार संघात विधानसभेची निवडणूक विकासाभिमुख कामावर होणार आहे.येथील जनता सुज्ञ असल्याने कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही हे वास्तव आहे.तर निवडणूक डोळ्यासमोर चमकोगिरी करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देणार हे नक्की..

ग्रामीण भागात केवळ आवाडेंची चर्चा
कबनूर,चंदूर,कोरोची या गावात राहुल आवाडे यांच्याच नावाची चर्चा आहे.मागील आठवड्यात वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या एका इच्छूक उमेदवाराने माझं वातावरण कसं आहे हे विचारताच एका अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या गुरूने,”साहेब, तुम्हाला कबनूर मध्ये कोण ओळखत पण नाही वाढदिवसाला आला म्हणून लोकं मतदान करतील असं नसतंय“. कबनूर मध्ये आवाडेंच्या विकास कामांची चर्चा असल्याचा मार्मिक टोला हाणला.त्यामुळे त्या इच्छुक उमेदवाराची बोलती बंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *