इचलकरंजी मतदार संघात संजय तेलनाडेंच्या उमेदवारी बाबत सस्पेंस कायम

इचलकरंजी/प्रतिनिधी
इचलकरंजी मतदार संघात उमेदवारी वरून रस्सीखेच सुरूच आहे.प्रत्येकजण मीच उमेदवार म्हणून यंत्रणा राबवत आहे.त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदार संघात किती उमेदवार असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.मात्र माजी पाणी पुरवठा सभापती संजय तेलनाडे हे देखील आमदारकीच्या शर्यतीत असून, त्यांच्या उमेदवारी बाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.

माजी पाणीपुरवठा सभापती सभापती राहिलेले संजय तेलनाडे यांनी विधानसभेपुर्वी मतदार संघ पिंजून काढत सर्वसामान्यांच्या मनातला उमेदवार म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली होती.स्वखर्चातून विकास कामे करून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती.याची धास्ती अनेकांनी घेतली होती.

दरम्यान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांना हद्दपार केल्याने त्यांच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.मात्र सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा असून संजय तेलनाडे आमदारकीचा अर्ज दाखल करणार का?याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

इचलकरंजी सह कबनूर,चंदूर, तारदाळ,कोरोची या भागातही त्यांचा चांगला लोकसंपर्क असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.मात्र त्यांनी याबाबत अद्याप मौन बाळगल्याने त्यांच्या उमेदवारी बाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *