इचलकरंजीत महिला गारमेंट उद्योजकता शिबिर
उत्साहात

इचलकरंजी (शैलेंद्र चव्हाण)

इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा सहकार भारती , डी.के.टी.ई.कॉलेज व प्रेरणा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला गारमेंट उद्योजकता शिबिर
उत्साहात पार पडले.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे होत्या.

प्रारंभी या शिबिराची सुरुवात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते व सहकार भारतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जवाहर , सहकार भारती महिला संस्था प्रकोष्ट प्रदेश अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, यू.जे. पाटील , माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

Advertise


यावेळी प्रेरणा महिला मंचच्या संचालिका व महिला बचत गटाच्या प्रमुख महिला यांच्यासह पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *