चंदूर-प्रतिनिधी
चंदूर गावची सुपुत्री कु.पुनम शिवाजी मंगसुळे व चंदूर गावचा सुपुत्र कु.सुनिल विष्णु पुजारी यांची मुंबई पोलिस पदी नियुक्ति झालेबद्दल ग्रामपंचायत चंदूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती महेश पाटील ,माजी सभापती श्रीमती शालन पाटील (आऊ), सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच संजय जिंदे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, संदीप कांबळे, बाबासाहेब मंगसुळे,रुपाली पुजारी, भगवान पुजारी,ग्रामविकास अधिकारी बी.व्ही.कांबळे सचिन पुजारी आदी उपस्थित होते.