आम्ही कर्तव्य करतोय, पालकांनीही लक्ष द्यावे लक्ष्मीपूरी पोलीस निरीक्षक एस.एल.कटकधोंड


कोल्हापूर/प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना शहरवासीयांच्या वाचनात आली.एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या पोरांना अमानुषपणे कोल्हापुरात सोडून पळ काढला.ही बाब लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री एस एल कटकधोंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तातडीने शोध मोहीम चालू करून मुलांच्या आजी-आजोबांशी संपर्क केला व सदरची मुले सुखरूप त्यांच्या ताब्यात दिली.

Advertise Content

या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याची दखल घेत शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या वतीने श्री एस.एल.कटधोंड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाई बाबुराव कदम, वैशाली सूर्यवंशी, गिता जाधव, प्रिया जाधव, योगिता पाटील, भाई सचिन जाधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *