कोल्हापुरात पकडली 10 कोटींची व्हेल माशाची उलटी

कोल्हापूर-प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या 5 जणांना कोल्हापूर पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून पडकले आहे.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण तस्करीमध्ये गुंतलेले आहेत.व्हेल माश्याच्या उलटीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने याचा गैरफायदा घेत अनेकदा व्हेल माश्यांची शिकार केली जाते.या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने यावर बंदी आणली आहे.मात्र,त्यानंतरही याची तस्करी थांबलेली दिसत नाही.कोल्हापुरात व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सापळा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे.ही आजपर्यंतची कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार आजरा पोलिसांनी सकाळपासूनच अंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता.दरम्यान या मार्गावरून सदर संशयित आरोपी जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले,यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यात व्हेल माशाची उलटी मिळून आली. या प्रकरणी आता आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हेल माशाची उलटी म्हणजे काय?
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेली उलटी अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात.जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीने विकले जाते. त्यात व्हेल माशाच्या उलटीपासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अंबरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते.अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह म्हणून वापरतात.सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावा यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते.व्हेल माशाची उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा कोणताही वाईट परिणाम शरीरावर होत नाही. त्यामुळे त्याला अधिक मागणी आहे.त्यामुळे सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.याचाच गैरफायदा घेऊन तस्करीसाठी याचा वापर केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *