इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या प्रशासक तथा आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.येथील आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांची मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाल्याने पद रिक्त झाले होते.श्री दिवटे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

इचलकरंजी नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त तथा प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती.इचलकरंजी मधील अतिक्रमण विरोधी मोहीम राबवल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
वर्षभराच्या आपल्या कारकिर्दीत श्री. देशमुख यांनी महापालिका प्रशासकीय कामकाजाला चांगलीच शिस्त लावली होती. त्याचबरोबर महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी त्यांनी विविध स्तरावर तसेच शासनाकडे पाठपुरावा केला होता.
अतिक्रमण व वाहतूक आराखड्यावर विशेष लक्ष देण्याची गरज
नूतन आयुक्त तथा प्रशासक यांनी पदभार स्वीकारला असून,शहरातील वाढलेले अतिक्रमण, तसेच फुटपाथ वरील वाढते अतिक्रमण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच शहरातील वाहतूक कोंडी तसेच वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुयोग्य वाहतूक आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे जरुरीचे आहे.