माय आत्मनिर्भर बेटी अभियानाचा समारोप संपन्न

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
माय फौंडेशन द्वारा आयोजित व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहयोगाने, सलग ४५ दिवस चालेल्या माय आत्मनिर्भर बेटी अभियानचा समारोप आज संपन्न झाला.

ह्या शिबिराचे हे ४ थे वर्ष होते. सलग ४५ दिवस चालेल्या माय आत्मनिर्भर बेटी अभियान मध्ये मार्शल आटर्स, व्याख्यान, सोशल मीडिया अवेअरनेस, एथिलीट गेम, रनिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, टीमवर्क विकसित करणे, अभिनय कला, वक्तृत्व स्पर्धा आदिंचा समावेश होता.

आजच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. श्री एस.पी. मर्दा हे होते.तसेच रोटरी चे अध्यक्ष श्री सत्यनारायणजी धूत, सेक्रेटरी श्री प्रकाशजी गौड, माय फौंडेशन चे उपाध्यक्ष श्री श्यामसुंदरजी मर्दा, सेक्रेटरी डॉ श्री लक्ष्मीकांतजी तोष्णीवाल हे होते.

माय फौंडेशन ने सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचे महत्व खूप असून, भविष्यात मुलींच्या साठी अविरत कार्य करणारी संस्था म्हणून ,माय फौंडेशन व रोटरी चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, भविष्यात पालकांनी अश्या शिबिरात जास्तीत जास्त मुलींना पाठवावे असे प्रतिपादन डॉ. श्री एस.पी. मर्दा यांनी केले.

मुलींनी, लघु नाट्य, मार्शल आर्ट्सचे विविध प्रकार सादर केले. शिबिरात घेतलेल्या स्पर्धेतील यशस्वी मुलींना बक्षिसे देण्यात आली व सर्व मुलींना सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देण्यात आले

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी माय सदस्य गोपाल चांडक, संजय रांदड, नवनीत बांगड, बालाप्रसाद भुतडा, अजित चितलांगिया, दीपक बियाणी व माय फौंडेशन च्या अनेक सदस्यांनी सलग 45 दिवस प्रचंड मेहनत घेतली तसेच सर्व माय फौंडेशन, रोटरीचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माय सदस्य श्री दीपक राठी यांनी केले तर आभार श्री वासुदेव तोतला यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *