सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा

सांगली-प्रतिनिधी

सांगलीमध्ये रिलायन्स ज्वेलर्स वर चोरट्यानी सशस्त्र दरोडा टाकून सिने स्टाईलने दुकान लुटले.आज दुपारी सांगली मार्केट यार्ड च्या शेजारी सांगली मिरज रोड लगत मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेलर्स वर15 जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला.माॕल मधील कर्मचाऱ्यांना बांधून घालून संपूर्ण दुकान लुटले.

मोठा ऐवज नेल्याने तसेच कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून दरोडेखोर पसार झाले असून सदरची घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करुन पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *